मुंबई
Internet Bar Police Raid : इंटरनेट बारवर पोलिसांची धाड
पनवेल : पनवेल तालुक्यातील आसुडगाव येथील इंटरनेट या लेडीज सव्हींस बारवर खांदेश्वर पोलिसांनी धाड टाकून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या आदेशानुसार आसुडगाव येथील तपोवन इमारतीत असलेल्या इंटरनेट बार वर पोलिसांनी धाड टाकून हा बार रात्रभर सुरू राहत असून त्यांचे मालक, व्यवस्थापक परवान्यातील अटी पाळत नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून तेथे कारवाई केली आहे.