मुंबई

International Yoga Day : योगाच्या महोत्सवाची जय्यत तयारी! 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन; “एक पृथ्वी, एक आरोग्य” ही यंदाची थीम

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तटरक्षक दलाकडून विशेष कार्यक्रमाचे आमंत्रण

मुंबई :- 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात तयारीला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दल (पश्चिम विभाग) यांच्याकडून विशेष योग कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाचे कमांडर आय. जी. भीष्म शर्मा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निमंत्रण दिले. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

दरवर्षी 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत यंदाची थीम “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” अशी ठरवण्यात आली आहे. मागील महिन्यात ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या थीमची घोषणा करत योगाचे वैश्विक मूल्य अधोरेखित केले होते.

संयुक्त राष्ट्र महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी भारताच्या प्रस्तावाला मान्यता देत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यास परवानगी दिली. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हा दिवस ‘ग्रीष्म संक्रांती’चा दिवस मानला जातो, जो उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगाचा हा अमूल्य वारसा भारताकडून संपूर्ण मानवजातीस दिलेले एक अनमोल योगदान मानले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0