International Drug Racket : 2.60 कोटींहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त, 7 आरोपींना अटक, एमडी तस्करीचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड

Ambernath International Drug Racket Busted News : अंमली पर्दाथ पक्षाने उल्हासनगर, अंबरनाथ आणि शिळ-डायघर येथे केलेल्या तीन कारवाईत एकूण 2.60 कोटी रुपयांचे एम.डी आणि गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून आंतरराज्यीय कनेक्शनचा तपास सुरू आहे.
उल्हासनगर :- ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थांबाबत मोठी कारवाई केली आहे. Thane Anti Narcotics Crime Branch तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये नार्कोटिक्स सेलने 2.60 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. 3 Crore Worth Drugs Seized in Thane ठाणे शहरातील शीळ डायघर परिसरात असलेल्या चेतन अपार्टमेंटमधील रुम क्रमांक 202 वर छापा टाकून पहिली कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 1.109 ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 2 कोटी 25 लाख 45 हजार रुपये आहे.या प्रकरणी इलियास कुशल खान (19 वय), अमन कमाल खान (21 वय) आणि सैफ अली खान अशी तीन आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. सैफ त्यांचा लीडर असल्याचे सांगण्यात येत आहे.


अंबरनाथ शहरातील नेवाळी नाका येथे करण्यात आली. येथे टाकलेल्या छाप्यात सुमारे 45 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत 22 लाख 85 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातही पोलिसांनी मंगल उत्तम पवार (25 वय) आणि अमर सुभाष पवार (36 वय ) अशी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा Hilline Police Station दाखल करण्यात आली आहे.
तिसऱ्या कारवाईत उल्हासनगर-3 मध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे 58 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे 12 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातही दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे आरिफ मोहम्मद शरीफ खान (21 वय) आणि सफीकुर रहमान सिराज अहमद खान (22 वय ) आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदशि गावित, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपेश किणी, पोलीस उपनिरीक्षक मोहन परब, पोलीस हवालदार अमोल देसाई, प्रशांत राणे, संदीप भांगरे, हेमंत महाले, महेश साबळे, हुसेन तडवी, हरीष तावडे, अभिजीत मोरे, शिवाजी वासरवाड, विक्रांत पालांडे, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे.