देश-विदेशमुंबई
Trending

PM Modi commissions 3 naval vessels : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस निलगिरी, आयएनएस सुरत या युद्ध लोकांचे आय एस एम वाघशीर पाणबुडीचे राष्ट्रार्पण सोहळा

PM Modi commissions 3 naval vessels : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi commissions 3 naval vessels यांच्या शुभहस्ते भारतीय नौदलाच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या आयएनएस निलगिरी, आयएनएस सुरत या युद्धनौका तसेच आयएनएस वाघशीर या पाणबुडीचा राष्टार्पण सोहळा आज संपन्न झाला.

भारतात पहिल्यांदाच तीन सामरिक नौकांचे एकत्रित जलावतरण झाले असून याद्वारे देशाच्या सामरिक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या तिन्ही लढाऊ नौकांची बांधणी ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून हीदेखील एक मोठी उपलब्धी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची लष्करी क्षमता वाढत असून देश अधिक शस्त्रसज्ज आणि बलशाली होत आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तसेच तिन्ही दलांचे प्रमुख आणि माझगाव डॉक मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो गॅलरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0