क्राईम न्यूजठाणे
Trending

कळवा ; शाळेत गेलेली 14 वर्षीय मुलगी थेट नागपूरमध्ये

Kalwa Police Station News : कळवा पोलिसांची कामगिरी बेपत्ता झालेल्या मुलीला शोधण्यास पोलिसांना यश, बारा तासांच्या आत मुलीला पोलिसांनी शोधून काढले

कळवा :- बदलापूर घटनेनंतर राज्यात Badlapur School News अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या भागातून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे पालकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कळवा पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत गेलेली मुलगी थेट नागपूरला पोलिसांना Nagpur Police सापडली आहे. हरविलेल्या मुलीला शोधण्यात पोलिसांना बारा तासाच्या आत यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशा नयन हजारे (38 वर्ष रा. भाग्यरेखा सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल कळवा) यांची 14 वर्षीय मुलगी शाळेत गेली होती. ‌ परंतु शाळेचे वेळ संपल्यानंतरही मुलगी घरी परत न आल्याने मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी शाळेत तपासणी केली असता मुलगी शाळेतच गैरहजर असल्याचे पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती.

कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार अशा 2 टीम तयार करण्यात आल्या मुलीचा तपास सुरु करण्यात आला. मुलगी राहत असलेल्या परिसरातील महानगरपालिकेने बसवलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे याची तपासणी केली असता ते बंद असल्याचे दिसून आले.त्यामुळे मुलीच्या बाबत काही एक ठोस माहिती मिळून आली नाही . त्यावेळी मुलगी शिकत असलेल्या शाळेची रात्री 3 वाजता तपासणी करण्यात आली तेथे देखील उपयुक्त माहिती मिळाली नाही.त्यामुळे परिसरातील रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, इत्यादी ठिकाणी तिचा शोध घेण्यात आला होता परंतु काही माहिती मिळाली नाही. त्यावेळी मार्केट मधील व्यवसायिक याचे दुकान मध्ये लावण्यात आलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे यांची पाहणी केली असता ती मुलगी न्यू इंग्लिश स्कूल कळवा येथून कळवा नाक्याच्या दिशेने जाताना दिसून आली तेव्हा परिसरामधील सर्व सी.सी.टी.व्ही कॅमेरे यांची तपासणी केली असता ती एका रिक्षा मधून ठाणे च्या दिशेने जाताना दिसली. तेव्हा तांत्रिक माहितीच्या आधारे रिक्षावाल्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचाकडे मुली विषयी चौकशी केली असता ती तलाव पाली येथे उतरल्याचे समजले. त्यानंतर पुढील सी.सी.टी.व्ही कॅमेरे यांची तपासणी केली असता ती ठाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी गेल्याचे समजले व तेथून ती सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये बसलेली दिसून आली तेव्हा लागलीच नागपूर रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधून मुली विषयी माहिती दिली असता मुलीला रेल्वे पोलिसांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. तेव्हा मुलीचा ताबा घेण्यासाठी मुलीची आई व एक पथक नागपूर या ठिकाणी पाठवण्यात आले मुलीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता आई-वडिल यांच्यामध्ये होत असलेल्या वादाला कंटाळून ती घर सोडून आल्याचे तिने माहिती दिली. मुलीचे योग्य समोउपदेशन करून मुलीला सुखरूप तिच्या आई वडिलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक

सुभाषचंद्र बुरसे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 ठाणे, उत्तम कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे ,पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे पोलीस हवालदार संदीप महाडीक ,महेंद्र शेळके, शहाजी एडके,गणेश बांडे,श्रीमंत राठोड,राहुल पवार, पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 14 वर्षीय मुलीला शोधून काढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0