•गौतम गंभीरचे ‘शेवट होईपर्यंत काहीच संपलेले नसते’ ट्विट व्हायरल; जेमिमा रॉड्रिग्जच्या खेळीचे विशेष कौतुक
मुंबई :- आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 च्या उपांत्य सामन्यात भारताने सात वेळची विश्वविजेती ऑस्ट्रेलिया संघावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी, जे सध्या ऑस्ट्रेलियात आहेत, त्यांनीही नवी मुंबईतील या विक्रमी विजयाबद्दल महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अप्रतिम खेळ करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केले आणि अंतिम फेरीत धडक मारली. या विजयाचे शिल्पकार ठरल्या जेमिमा रॉड्रिग्ज जिने अफलातून शतकी खेळी केली.
माजी आणि विद्यमान खेळाडूंकडून शुभेच्छा
या विजयानंतर सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी महिला संघाला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकर यांचे कौतुक: भारतीय क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “शानदार विजय! जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी पुढे येऊन अप्रतिम फलंदाजी केली. श्री चर्णी आणि दीप्ती शर्मा यांनीही गोलंदाजीत उत्कृष्ट साथ दिली. तिरंगा असाच उंच फडकवत राहा!”
गौतम गंभीर आणि रोहित शर्माचा संदेश: ऑस्ट्रेलियात असलेल्या टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर एक प्रेरणादायी संदेश शेअर केला, जो व्हायरल होत आहे: “जोपर्यंत शेवट होत नाही, तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं! जबरदस्त खेळलात तुम्ही सर्वांनी. आता अंतिम लढाई बाकी आहे.”
माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी उपांत्य सामना संपताच जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनजोत कौर यांच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत लिहिले की, “शाब्बास, टीम इंडिया…”
सेहवागनं आपल्या एक्स अकाऊंटवरून सेमीफायनल लढत संपल्यानंतर केलेल्या पोस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला लक्ष्य केलं आहे. “ऑस्ट्रेलियाचा संघ विचार करत होता की हा आणखी एक सेमी फायनलचा सामना आहे. आरामात जिंकुयात आणि फायनलमध्ये जाऊयात. पण आपल्या मुलींनी विचार केला की खरा धमाका करण्याची हीच खरी वेळ आहे. सगळ्या टीकाकारांना आपल्या खेळाडूंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काय मस्त खेळलात! आपल्या महिला क्रिकेटपटूंचा अभिमान वाटतोय”, असं सेहवागनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…