India vs South Africa Highlights, 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेने भारताच्या जबड्यातून विजय हिसकावला, दुसऱ्या T20 मध्ये भारताचा 3 गडी राखून पराभव
India vs South Africa Highlights, 2nd T20 : टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 5 बळी घेतले.
IND vs SA 2nd T20 :- दक्षिण आफ्रिकेने South Africa रोमहर्षक सामन्यात भारताचा India पराभव केला आहे. त्यांनी टी-20 मालिकेतील दुसरा सामना 3 गडी राखून जिंकला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.प्रथम फलंदाजी करताना भारताने 124 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 19 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 47 धावा केल्या. कोएत्झीने नाबाद 19 धावा केल्या.
वरुण चक्रवर्तीने भारतासाठी घातक गोलंदाजी करताना 5 बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने फलंदाजी करताना नाबाद 39 धावा केल्या.
भारतीय संघासाठी अभिषेक शर्मा पुन्हा अपयशी ठरला, त्याला केवळ 4 धावा करता आल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा संजू सॅमसन या चकमकीत शून्य धावांवर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपल्या बॅटमधून केवळ 4 धावा काढल्या.वर्माला पुन्हा सुरुवात झाली, पण 20 धावांचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या, मात्र 45 चेंडूत 39 धावा केल्याबद्दल तो खूप ट्रोल झाला.
125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. 44 धावा होईपर्यंत आफ्रिकन संघाने 3 विकेट गमावल्या होत्या आणि 86 धावा होईपर्यंत संघाचे 7 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
येथून ट्रिस्टन स्टब्स आणि जेराल्ड कोएत्झी यांच्यातील नाबाद 42 धावांच्या भागीदारीने आफ्रिकन संघाचा विजय निश्चित केला. कोएत्झी एक गोलंदाज म्हणून ओळखला जातो, पण शेवटी त्याने 9 चेंडूत 19 धावांची छोटीशी खेळी खेळून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.तर ट्रिस्टन स्टब्सने 41 चेंडूत 47 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.