India vs South Africa 1st T20 : भारताचा T20 मध्ये सलग 11 वा विजय, घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव.
India vs South Africa 1st T20 Match Result : भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. संजू सॅमसन शतक झळकावून टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
IND vs SA 1st T20 :- भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना स्कोअरबोर्डवर 202 धावा केल्या होत्या.प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 141 धावा करून सर्वबाद झाला.भारतीय संघाच्या विजयात संजू सॅमसनचे शतक, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीची भूमिका महत्त्वाची ठरली. सॅमसनने 107 धावा केल्या, तर बिश्नोई आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. अभिषेक शर्माला मोठी खेळी खेळता आली नाही, पण संजू सॅमसनने सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला आहे.त्याने 50 चेंडूत 107 धावा करताना 7 चौकार आणि 10 षटकार मारले. टिळक वर्माने 18 चेंडूत 33 धावांची तुफानी खेळी करत भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पॅट्रिक क्रुगरचे 11 चेंडूंचे षटक भारतीय डावात चर्चेचे केंद्र ठरले.
घरच्या मैदानावर 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार एडन मार्कराम अवघ्या 8 धावा करून बाद झाला आणि धावसंख्या 44 पर्यंत यजमान संघाने तीनही आघाडीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या होत्या.हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी 42 धावांची भागीदारी केली, मात्र वरुण चक्रवर्तीने एकाच षटकात दोघांनाही बाद करून आफ्रिकन संघाला मोठा धक्का दिला. पॅट्रिक क्रुगरसाठी हा दिवस वाईट ठरला कारण खराब गोलंदाजीनंतर त्याला फलंदाजीत फक्त एक धाव करता आली.