India vs New Zealand Highlights, 1st Test, Day 4 : बंगळुरू कसोटीत भारताने न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला.
BCCI :- भारत विरुद्ध न्यूझीलंड India vs New Zealand यांच्यातील बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने केवळ 4 चेंडू खेळले, ज्यामध्ये संघाला आपले खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 107 धावा करायच्या आहेत. India vs New Zealand Highlights
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 231 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी टीम इंडियाने आपला स्कोअरबोर्ड पुढे सरकवला. सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्यात १७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाल्याने चौथ्या दिवसाची पहिली दोन सत्रे भारताच्या नावावर होती. सर्फराजने 150 धावा केल्या, तर ऋषभ पंत 99 धावा करून बाद झाला.मात्र यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. India vs New Zealand Highlights
भारताने 3 गडी गमावून 408 धावा केल्या होत्या. मात्र सर्फराज खानची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग स्ट्रगल मोडमध्ये गेली. परिस्थिती अशी होती की भारताने शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या.चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुलला मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्केच्या घातक गोलंदाजीसमोर केवळ 12 धावा करता आल्या, तर रवींद्र जडेजालाही केवळ 5 धावा करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…