Maharashtra Politics : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जनता’ वृत्तपत्राच्या 3 खंडांचे प्रकाशन, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

•डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या इंग्रजी खंड चारचा मराठी अनुवाद आणि तीन खंड 7,8 आणि 9 च्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या इंग्रजी खंड चारचा मराठी अनुवाद, तीन खंड 7,8 आणि 9 आणि इंग्रजी खंड दोनच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन केले.जनता खंड 7, 8 आणि 9 ची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधना प्रकाशन समितीने केली आहे.


कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉ.प्रदीप आगलेवे, सदस्य योगीराज बागुल, जे.व्ही.पवार, डॉ.संभाजी बिरंजे व इतर मंत्रीमंडळ सदस्य उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1930 ते 1956 पर्यंत ‘जनता’ वृत्तपत्र प्रकाशित झाले. ‘जनता’ वृत्तपत्र हे आंबेडकर चळवळीचा एक दस्तऐवज आहे.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन, सरकारने त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुनर्प्रकाशित करून ते सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत डॉ.आंबेडकर चरित्र साधना प्रकाशन समितीने जनताचे 6 खंड प्रकाशित केले आहेत.
जनता खंडांमध्ये काय असणार
जनता खंड 7-12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश
जनता खंड 8- 4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश
जनता खंड 9- 3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश


