India Vs Australia : पाऊस जिंकला! भारत-ऑस्ट्रेलिया पाचवा टी-20 सामना रद्द; टीम इंडियाने 2-1 ने मालिका जिंकली

India Vs Australia Latest News : गाबावर पावसाची बॅटिंग; 4.5 षटकांत 52 धावांच्या तुफानी सलामीवरच सामन्यावर पडदा; भारतीय संघाने मालिका जिंकून इतिहास रचला
India (IND) vs Australia (AUS) 5th T20 :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यावर अखेर पावसाने पाणी फेरले. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू असलेला हा सामना सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे रद्द करण्यात आला आहे. यामुळे भारतीय संघाने टी-20 मालिका 2-1 च्या फरकाने आपल्या नावावर करत मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने 4.5 षटकांत बिनबाद 52 धावा करत शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी सलामीमुळे दमदार सुरुवात केली होती. मात्र, जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सामना थांबवण्यात आला. पावसाने काही वेळासाठी विश्रांती घेतली, परंतु पुन्हा एकदा वादळ-वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आणि खेळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी, चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन
मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, एडम झांम्पा



