महाराष्ट्र
Trending

India-UK : भारत-ब्रिटनमध्ये ऐतिहासिक व्यापार करार संपन्न: 34 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराची नवी पहाट!

India -UK Latest News : पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या; उभय देशांना मोठा फायदा होणार

ANI :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारत आणि ब्रिटनदरम्यान एक महत्त्वाचा मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement – FTA) संपन्न झाला. या करारामुळे उभय देशांमधील व्यापार तब्बल 34 अब्ज डॉलर्सने वाढण्याची अपेक्षा आहे. PM Modi London Visit Update

दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यवसाय व व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या ऐतिहासिक करारानंतर पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पंतप्रधान स्टार्मर यांनी या कराराचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “या कराराचा भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांना फायदा होईल. यामुळे दोन्ही देशांचे उत्पन्न वाढेल, लोकांचे राहणीमान उंचावेल, नोकरदारांच्या खिशातील पैसे वाढतील आणि उभय देशांमध्ये अधिक नोकऱ्या निर्माण होतील. व्यवसायासाठीचे वातावरण अधिक उत्तम होईल. यामुळे वस्तूंवरील कर कमी होईल आणि व्यापार अजून सुलभ होईल.”

स्टार्मर यांनी पुढे ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत या कराराचे महत्त्व पुन्हा सांगितले. त्यांनी म्हटले की, हा खूप महत्त्वाचा करार असून यामुळे यूकेमध्ये नव्या नोकऱ्या निर्माण होतील, व्यवसायाच्या संधी वाढतील आणि आपल्या देशात होणारी गुंतवणूक वाढेल. या कराराशी संबंधित आम्ही एक कृतीशील आराखडा तयार केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कराराचा भारतालाही मोठा फायदा होणार आहे. एफटीए हा भारताचा एखाद्या विकसित देशाबरोबरचा गेल्या १० वर्षांतील पहिला मोठा द्विपक्षीय व्यापार करार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने ही भारतासाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.

दुसरीकडे, ब्रिटनसाठीही हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. २०१६ मध्ये युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी मतदान केल्यानंतर आणि २०२० मध्ये अधिकृतपणे युरोपीयन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर (ब्रेक्झिटनंतर) यूकेने स्वाक्षरी केलेला हा सर्वात महत्त्वाचा करार आहे. या करारामुळे ब्रिटनला जागतिक स्तरावर नवीन व्यापार भागीदार शोधण्यात मोठे यश मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0