Uddhav Thackeray Target Amit Shah Son : अमित शहा यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर
मुंबई :- अमित शहा यांच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे UBT Group गटाचे नेते उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पनवेलमधील माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचे हिंदुत्व हे खरे हिंदुत्व असून भाजपचे हिंदुत्व हे खोटे हिंदुत्व असल्याचा आरोप, यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
अमित शहा यांच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलमान खान Salman Khan House Firing यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणी राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यामध्ये सध्या गुन्हेगारी वाढत असून ही गुन्हेगारी रोखण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नसल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेना फुटली असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावरच आरोप केले आहेत. अमित शहा यांच्या पुत्र प्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित शहा जेव्हा असे वाक्य बोलतात तेव्हा त्यांचे चेले-चपाटे वेगळे बोलतात, त्यामुळे तुमच्यात एक वाक्यता नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मी पुन्हा येणार म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनीच मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे अमित शहा यांनी आपल्या चेल्यांसोबत एक वाक्यता ठेवावी, असे आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…