देश-विदेश

Independence Day Live Updates: 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीने सोहळ्याची शोभा वाढली

ANI :- आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, देशाला संबोधित करताना त्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांमुळे पाकिस्तानला निश्चितच कडक संदेश मिळाला आहे. Independence Day Live Updates

पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने लाल किल्ल्यावर पुष्पवृष्टी केली, ज्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा अधिक वाढली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या वीर जवानांना लाल किल्ल्यावरून सलाम केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

vivek

Recent Posts