ठाणेक्रीडामुंबई
Trending

Ind vs West Indies 2nd test match : दिल्ली कसोटीत भारताची मजबूत पकड, पहिल्या दिवशी 318 धावांचा डोंगर

Ind vs West Indies 2nd test match : यशस्वी जैस्वालचे तुफानी 175; दुसऱ्या दिवशी द्विशतक हुकले, पण भारताच्या 400 धावा पूर्ण

Ind vs West Indies 2nd test match :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व गाजवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 318 धावांचा डोंगर उभा केला होता.

पहिल्या दिवसाचे हिरो: यशस्वी आणि साई सुदर्शन

सलामीला आलेल्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याने पुन्हा एकदा आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली. त्याने पहिल्याच दिवशी 173 धावांवर नाबाद राहत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची मजबूत पायाभरणी केली. त्याला साई सुदर्शनने (87 धावा) आणि कर्णधार शुबमन गिलने (नाबाद 20 धावा) चांगली साथ दिली.

जैस्वालचे द्विशतक थोडक्यात हुकले
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वालकडे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, मात्र 175 धावांवर असताना तो धावबाद झाला. फटका मारल्यानंतर धावण्यासाठी तो पुढे सरसावला, परंतु कर्णधार गिल धावण्यासाठी तयार नसल्याने त्याला माघारी फिरावे लागले आणि तो धावबाद झाला.

जैस्वाल बाद झाला असला तरी, भारतीय संघाने आपली धावसंख्या वाढवण्याची गती कायम ठेवली आहे. पहिल्या डावातील 105 षटके पूर्ण होईपर्यंत भारतीय संघाने 400 धावांचा पल्ला गाठला आहे. कर्णधार शुबमन गिल (नाबाद 60 धावा) आणि नितीश रेड्डी (नाबाद 40 धावा) यांनी डाव सावरत मोठी धावसंख्या उभारण्याची तयारी दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0