Ind vs Sa T-20 Series won ind :- अहमदाबादमध्ये भारताचा ‘अंतिम’ धमाका! दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव; टी-20 मालिका 3-1 ने खिशात

Ind vs Sa T-20 Series won ind :- हार्दिक-तिलकची वादळी अर्धशतके आणि वरुण चक्रवर्तीची ‘मॅजिक’ फिरकी; भारताचा सलग 14 वा मालिका विजय
Ind vs Sa T-20 Series won ind :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचा शेवट टीम इंडियाने दणक्यात केला आहे. पाचव्या निर्णायक सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 231 धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 201 धावांवर रोखत 30 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 2025 या वर्षाचा शेवट मालिका विजयाने केला असून सलग 14 व्या टी-20 मालिका विजयाचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हार्दिक आणि तिलकचे ‘रन’ वादळ दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. संजू सॅमसन (37 धावा) आणि अभिषेक शर्मा (34 धावा) यांनी 63 धावांची वेगवान सलामी दिली. मात्र, खरा खेळ सुरू झाला तो हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा मैदानात आल्यावर. हार्दिकने अवघ्या 16 चेंडूत भारताचे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने 25 चेंडूत 63 धावांची (5 चौकार, 5 षटकार) आक्रमक खेळी केली. तर तिलक वर्माने 42 चेंडूत 73 धावांची तुफानी खेळी करत भारताला 5 बाद 231 या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
डीकॉकची फटकेबाजी व्यर्थ; बुमराहचा ‘ब्रेकथ्रू’ 232 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डीकॉकने आक्रमक सुरुवात केली. त्याने अवघ्या 35 चेंडूत 65 धावा कुटल्या आणि दक्षिण आफ्रिकेला भक्कम स्थितीत आणले होते. 10 षटकांत आफ्रिकेने 1 बाद 118 धावा केल्या होत्या आणि सामना त्यांच्या बाजूने झुकलेला वाटत होता. मात्र, जसप्रीत बुमराहने डीकॉकला बाद करत भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला.
वरुण चक्रवर्तीची फिरकी आणि मालिकावीरचा किताब मध्यफळीत वरुण चक्रवर्तीने आपली जादू दाखवली. त्याने मार्रक्रम, फरेरा आणि लिंडे यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करत 4 विकेट्स घेतल्या. त्याने संपूर्ण मालिकेत 10 विकेट्स घेतल्यामुळे त्याला ‘मालिकावीर’ (Player of the Series) म्हणून गौरवण्यात आले. जसप्रीत बुमराहने 17 धावांत 2 बळी घेत धावगतीवर नियंत्रण मिळवले.



