IND vs PM XI Warm-Up Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पंतप्रधान इलेव्हन सराव सामना पावसामुळे रद्द!
IND vs PM XI Warm-Up Match :भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
IND vs AUS practice match :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरी कसोटी दिवस-रात्र गुलाबी चेंडूची कसोटी असेल. या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियाला पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळायचा होता. IND vs PM XI Warm-Up Match सराव सामना आज शनिवार, 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार होता, परंतु पावसामुळे पहिला दिवस नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.
मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होणे टीम इंडियाचे मोठे नुकसान ठरू शकते. कारण आता भारतीय संघाला गुलाबी चेंडू कसोटीच्या तयारीसाठी सराव सामन्यात फक्त एकच दिवस मिळणार आहे. हा सामना मनुका ओव्हलवर होणार असून, तिथे पाऊस टीम इंडियासाठी खलनायक ठरताना दिसत आहे.
पहिला दिवस पावसामुळे वाहून गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ 50 षटकांचा सामना खेळतील म्हणजेच दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांना 50-50 षटके खेळावी लागणार आहेत. अशा प्रकारे टीम इंडियाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात 50-50 षटके मिळतील.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 06 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. ही गुलाबी चेंडूची दिवस-रात्र कसोटी असेल, जी ॲडलेड ओव्हलवर खेळली जाईल.