क्रीडा

IND Vs PAK : विश्वचषकात भारताची ‘हॅट्ट्रिक’! पाकिस्तानचा सपशेल पाडाव; इशानची फटकेबाजी अन् बुमराह-हार्दिकचा भेदक मारा

•पाकिस्तानचा डाव 114 धावांत गारद; भारताचा सलग तिसरा विजय, बाद फेरीचा मार्ग झाला सुकर

Ind vs Pak T-20 world cup | कधी बहिष्कार, तर कधी अंतर्गत बंडाळी अशा वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या पाकिस्तान संघाला मैदानातही आपली कामगिरी सुधारता आली नाही. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच चुरशीचा होईल अशी अपेक्षा असते, मात्र कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शरणागती पत्करली. भारताने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ 114 धावांत आटोपला आणि भारताने दिमाखात विजय साजरा केला.

इशान किशनचे तुफानी अर्धशतक

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय सुरुवातीला योग्य वाटला, जेव्हा सलमान अली अघाने अभिषेक शर्माला स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढली. खेळपट्टी संथ असूनही इशानने 40 चेंडूंत 77 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये 10 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तिलक वर्माने 25 आणि सूर्यकुमार यादवने 32 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत हार्दिक पंड्या अपयशी ठरला तरी शिवम दुबेने मोक्याच्या क्षणी 17 चेंडूंत 27 धावा करत भारताला 175 धावांपर्यंत पोहोचवले.

पाकिस्तानी फलंदाजीची हाराकिरी

176 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद करून धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक यॉर्करवर सईम अयुबचा त्रिफळा उडवला. कर्णधार बाबर आझमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अक्षर पटेलच्या फिरकीने त्याला चकवले. उस्मान खानने 44 धावांची एकाकी झुंज दिली, पण इतर फलंदाजांनी त्याला साथ न दिल्यामुळे पाकिस्तानचा डाव 114 धावांवरच आटोपला.

भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी

भारताकडून गोलंदाजीमध्ये कमालीचे सातत्य पाहायला मिळाले. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनीही प्रत्येकी 2 बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या विजयासह भारताने गट साखळीत सलग तीन सामने जिंकून आपले स्थान भक्कम केले असून बाद फेरीच्या दिशेने प्रबळ पाऊल टाकले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

12 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

12 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

18 hours ago