क्रीडा

IND Vs ENG Test Match : हेडिंग्लेवर इंग्लंडचं वर्चस्व! भारताचं 371 धावांचं आव्हान पाच गड्यांनी पार

•जो रूट आणि जेमी स्मिथची संयमी खेळी, इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs Eng 1st test :- भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर ५ गड्यांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने दिलेलं ३७१ धावांचं आव्हान इंग्लंडने मोठ्या आत्मविश्वासाने पार करत कसोटी क्रिकेटमधील एक संस्मरणीय विजय मिळवला.

भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावांचा डोंगर उभारत सामन्यावर पकड मिळवली होती. केएल राहुलच्या १३७ धावा आणि ऋषभ पंतच्या ११८ धावांच्या झंझावाती खेळीनं संघ मजबूत स्थितीत पोहोचला. इंग्लंडने त्याला उत्तर देताना ४६५ धावा केल्या. त्यामुळे भारताला केवळ ६ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३७१ धावांचं कठीण लक्ष्य ठेवलं.

हे आव्हान पार करण्यासाठी इंग्लंडने अतिशय संयमी आणि सामूहिक फलंदाजीचा प्रत्यय दिला. जॅक क्रॉली आणि बेन डकेटने १८८ धावांची सलामीची भागीदारी करत भारताच्या गोलंदाजांना पहिला ब्रेक मिळू दिला नाही. क्रॉली ६५ धावांवर बाद झाला आणि लगेचच ओली पोपही शून्यावर तंबूत परतला. प्रसिद्ध कृष्णाने हे दोन बळी मिळवत भारताला सामन्यात परतण्याची संधी दिली.

नंतर शार्दुल ठाकूरने बेन डकेट (९९) आणि हॅरी ब्रुकला सलग चेंडूंवर बाद करत इंग्लंडचा डाव डळमळीत केला. मात्र इथूनच जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी डाव सावरला. स्टोक्स बाद झाल्यानंतर जो रूटने ५३ नाबाद धावा करत विजयाची धुरा सांभाळली. त्याला जेमी स्मिथचा (४४) अडून उभा राहणारा पाठिंबा* मिळाला.

भारतीय गोलंदाजांनी सर्व बाजूंनी प्रयत्न केले. पण रूटचा अनुभव आणि स्मिथची संयमता यांच्या भक्कम भागीदारीपुढे ते निष्प्रभ ठरले. प्रसिद्ध कृष्णा व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. रविंद्र जडेजाला एकमेव यश मिळालं.

या पराभवाने भारताला मालिकेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला असून, पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago