देश-विदेशक्रीडा
Trending

IND vs ENG 3rd Test: बुमराह-आर्चर आमनेसामने; लॉर्ड्सवर आज निर्णायक टेस्टला सुरुवात

IND vs ENG 3rd Test: गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा आत्मविश्वास वाढलेला, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारत प्रथम गोलंदाजी करणार आहे.

Ind vs Eng test match :- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आजपासून (10 जुलै) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जात आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, हा सामना जिंकणारी संघ मालिका आघाडी घेणार आहे. IND vs ENG 3rd Test

एजबस्टनमध्ये दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केलं. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने बर्मिंगहॅममध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला होता. आता लॉर्ड्सवर गिलच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहकडे असणार आहे, तर इंग्लंडच्या ताफ्यात जोफ्रा आर्चरची पुनरागमनाने चुरस वाढली आहे.टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानेही संघात एक महत्त्वपूर्ण बदल करत, प्रसिद्ध कृष्णाच्या जागी बुमराहला पुनर्प्रवेश दिला आहे.

सामन्याची सुरुवात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत झाली. त्यांनी पारंपरिक घंटा वाजवून सामन्याची सुरूवात केली. भारताकडून पहिला चेंडू बुमराहने टाकला, तर इंग्लंडसाठी झॅक क्रॉली आणि बेन डकेटने डावाची सुरुवात केली. आता क्रिकेटप्रेमींची नजर बुमराह आणि आर्चर यांच्यातील संभाव्य टक्करवर लागलेली आहे.

भारताचा संघ (Playing XI):

यशस्वी जायसवाल, केएल राहुल,करुण नायर,शुभमन गिल (कर्णधार),ऋषभ पंत (यष्टीरक्षक),नितीश कुमार रेड्डी,रवींद्र जडेजा,वॉशिंगटन सुंदर,आकाशदीप,जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संघ (Playing XI):

झॅक क्रॉली,बेन डकेट,ओली पोप,जो रूट,हॅरी ब्रूक,बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिथ (यष्टीरक्षक),क्रिस वोक्स,ब्रायडन कार्स,जोफ्रा आर्चर,शोएब बशीर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0