क्रीडा

IND vs ENG 1st Test : कसोटीचा अंतिम दिवस रोमांचक वळणावर! भारताने दिलं 371 धावांचं टार्गेट, इंग्लंडची दमदार सुरुवात

डकेटचं अर्धशतक, क्राऊलीसोबत अर्धशतकी भागीदारी

IND vs ENG 1st test :- भारत वि. इंग्लंड कसोटी सामना – अंतिम दिवस भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा शेवटचा आणि निर्णायक दिवस आज पार पडत आहे. भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचं अवघड लक्ष्य ठेवलं असून, इंग्लंडच्या सलामीवीरांनी या आव्हानाचा सामना करताना शानदार सुरुवात केली आहे.

चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने 6 षटकांत 21 धावा करत बिनबाद सुरुवात केली होती. आज सकाळपासून इंग्लिश सलामीवीर झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी आत्मविश्वासाने फलंदाजी केली आहे.

डकेटने 66 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने अर्धशतक साजरं केलं. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारीही रचली असून, इंग्लंडने 50 धावांचा टप्पाही पार केला आहे. भारतीय संघ अजूनही पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहे.

चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 364 धावांवर आटोपला. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडी धरून भारताने इंग्लंडपुढे 371 धावांचं लक्ष्य ठेवलं.या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने भक्कम सुरुवात केली आहे, त्यामुळे भारतासाठी लवकरात लवकर विकेट्स घेणं गरजेचं ठरणार आहे. विशेषतः बुमराहसह इतर भारतीय गोलंदाजांना आक्रमक आणि काटेकोर गोलंदाजी करत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवावं लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0