IND vs AUS : पर्थ कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियाचा पराभव, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना जिंकला
IND vs AUS head to head record Records : भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमधील पहिली कसोटी जिंकून विजयाने केली.
IND vs AUS 1st Test :- बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ 238 धावांवर ऑलआऊट झाला.ऑस्ट्रेलियाकडून धावांचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडने 89 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 3-3 बळी घेतले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताला सामना जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 500 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सुरुवात केली होती.
भारताकडून फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा केल्या. जैस्वालने 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या. दरम्यान, विराट कोहलीने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक (100*) केले. तर केएल राहुलने 5 चौकारांच्या मदतीने 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.जैस्वाल, कोहली आणि राहुलच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या डावात 487 धावांची मोठी धावसंख्या फलकावर लावली आणि ऑस्ट्रेलियासमोर मोठे लक्ष्य ठेवले.
भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने संपूर्ण सामन्यात 8 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. बुमराहने पहिल्या डावात 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तर दुसऱ्या डावात 3 फलंदाजांना आपले बळी बनवले होते.