Rahul Kul : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राहुल कुल मैदानात ; विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प
Rahul Kul Baramati Lok Sabha Election : दौंड, ता. २२ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच दौंड तालुक्यातही राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून अनेक राजकीय नेते आता ॲक्सेन मोडवर आले आहेत. दौंड चे आमदार राहुल कुल यांनी संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं दिसून येत आहे. Rahul Kul
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी व बूथ समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या दौंड तालुक्यातील बूथ प्रमुखांची बैठक आ. कुल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पार पडली. निवडणुकीत बूथ यंञणा मजबूत करणे, मतदार यादी अद्ययावत माहिती तसेच निवडणूक संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर मतदारांना संपर्क साधावा, मोदी सरकारद्वारे करण्यात आलेली विकासकामे घरोघरी पोहोचवावी, विविध योजनांच्या लाभार्थींना संपर्क साधावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. दौंड तालुक्यातील भाजपाच्या सगळ्या प्रभागांत नव्याने प्रभाग प्रमुखांसह भाजपच्या बूथ निहाय बांधणी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीत आत्तापासूनच चुरस पाहायला मिळत आहे. Rahul Kul
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा कांचन कुल, भाजपा तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, संघटक सरचिटणीस उमेश दिवेकर, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस शेखर वढाणे इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Rahul Kul