Illegal Migrants in Mumbai : मुंबईत बांग्लादेशीय नागरिकांचे बेकायदेशीर वावर, घुसखोर बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांकडून अटकेचे सत्र
Illegal Migrants in Mumbai : अनैतिक मानवी प्रतिबंधक विभाग नालासोपारा यांची कारवाई ; तीन बांग्लादेशीयi नागरिकांवर कारवाई, आरोपींना अटक
नालासोपारा :- भारतात खास करून मुंबई आणि उपनगर यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशीय नागरिक अवैधरित्या राहत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच वसई विरार नवी मुंबई आणि मुंबईतून जवळपास 50 एक बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीर रित्या भारतात घुसखोर करून खोटे कागदपत्र तयार करून वास्तव्य करत असल्याच्या घटना समोर आले आहे. नालासोपाराच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या तीन घुसखोर करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांची धाड तीन आरोपी गजाआड
नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वेदांत पॅलेस हनुमान नगर नालासोपारा येथे काही बेकायदेशीररित्या बांग्लादेशी लोक राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी सापळा रचून दोन पंच साक्ष घेऊन वेदांत पॅलेस येथे धाड टाकली होती. तेव्हा पोलिसांना तीन बांग्लादेशी नागरिक आढळून आले त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची कोणतेही कागदपत्र नव्हते, तसेच त्यांच्याकडे पासपोर्ट व्हिसा नव्हता त्यामुळे पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणे अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3 (अ),6 (अ) सह विदेशी अधिनियमन 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्याचा त्यातील मुख्य आरोपी हा सध्या फरार असून पोलिसांकडून चौथ्या आरोपीचा शोध घेत आहे. Illegal Migrants in Mumbai News
अटक आरोपींची नावे
1) रियाज कुबाद शेख (31 वर्ष)
रा. रुम नं.305 वेदांत पॅलेस हनुमान नगर नालासोपारा पश्चिम, मुळ देश-बांग्लादेश,
2) मारुफ कुबाद शेख (23 वर्ष) रा. रुम नं. 109 वेदांत पॅलेस हनुमान नगर नालासोपारा पश्चिम मुळ देश-बांग्लादेश
3) शाहरुख कुबाद शेख (19 वर्ष) रा. रुम नं.109 वेदांत पैलेस हनुमान नगर नालासोपारा पश्चिम ता. वसई जि. पालघर, मुळ देश बांग्लादेश, या तीन आरोपी यांना ताब्यात घेवून मुख्य आरोपी 4) कुबाद मंदार शेख (55 वर्ष) रा. रुम नं.109 वेदांत पॅलेस हनुमान नगर नालासोपारा ,मुळ देश बांग्लादेश , तसेच वरील 1 ते 3 आरोपी यांचे वडील असे सांगितले आहे.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी चाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार शेटये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार पागी, सर्व नेम.अन.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा विभाग यांनी अटक केली आहे. Illegal Migrants in Mumbai News