Illegal Migrant In Nalasopara : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला पकडले
Illegal Bangladeshi Migrant Arrested By Nalasopara Police : नालासोपारा भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 1 बांगलादेशी महिलेला पकडले. बांगलादेशी महिला बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करून नालासोपारात राहत होती
नालासोपारा :- नालासोपारा येथील शिवकृपा पासपोर्ट अँड ज्यूस सेंटर समोरील ब्रिज खाली या परिसरात एक बांगलादेशी महिला Illegal Bangladeshi Women Migrant बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत त्या महिलेला अटक केली आहे. महिला भारतात बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करून बेकायदा वास्तव्य करत होती. NalaSopra Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकृपा पासपोर्ट अँड ज्यूस सेंटर समोरील ब्रिज खाली असलेल्या परिसरात बेकायदा एक बांगलादेशी महिला वास्तव्य करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्या संशयित महिलेला ताब्यात घेतले. बांगलादेशी महिलेने आपले नाव सिमा रफिक खान (40 वय वर्ष रा.नगीनदास मच्छिमार्केट जवळ नालासोपारा पुर्व मुळ रा.खुलना बांग्लादेश) असे सांगितले. पोलिसांनी तीचेकडे तीचे भारतीय नागरीक असल्याबाबतचे कागदपञ विचारले असता तीने भारतीय नागरीकत्यांचे कागदपत्र सादर केले नसून ती काही वर्षापुर्वी तिच्या पतीसह कामानिमित्त बांग्लादेश मधुन कलकत्ता व तेथुन मुंबई येथे विना तिकीट प्रवास करुन ट्रेनने आले असून तीचा पती रफीक शेख हा नालासोपारा येथे सोडुन पुन्हा बांग्लादेश येथे गेला असल्याचे तीने सांगितले आहे. महीलेवर तुळींज पोलीस ठाणे भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NalaSopra Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार तसेच महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, पोलीस हवालदार पागी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. NalaSopra Latest Crime News