पुणे

Illegal Construction Kondhwa | कोंढवा बनतोय अनधिकृत बांधकामाच माहेरघर !

'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम निरीक्षकांची अँटी करप्शन कडून झाडाझडती आवश्यक

Illegal Construction Kondhwa

पुणे, दि. ८ मार्च, महाराष्ट्र मिरर टीम : Illegal Construction Kondhwa | Kondhwa is becoming a haven for unauthorized constructions: The construction inspectors who ignore ‘meaningful’ need to be investigated by anti-corruption.

देशातच नव्हे तर जगात सर्वात जास्त वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पुणे शहर प्रसिद्धीस येत आहे. मेट्रो, अंडरपास, ओव्हरब्रीज, २४ तास समान पाणी पुरवठा योजना, नदी सुभोभिकरण प्रकल्प अशा विकास योजना राबवित असताना अनधिकृत बांधकामामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. त्यातच कोंढवा परिसर हे अनधिकृत बांधकामांचे माहेरघर बनले आहे. दोन गुंठे जागेत तब्बल ७-८ मजली मजली टोलेजंग बांधकामे करून पुणे महानगरपालिका व शासनाचे महसूल मोठ्या प्रमाणावर बुडवण्यात येत आहे. त्यातच बांधकाम विषयक ‘महरेरा’ कायद्यांची पायमल्ली करत अनधिकृत बांधकामे बेकायदा सामान्य नागरिकांना विक्री करून अनधिकृत बिल्डर मालामाल होत आहेत. याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम निरीक्षकांची अँटी करप्शन कडून झाडाझडती आवश्यक आहे.

कोंढवा येथील स.न. ३८ येथे पारगे नगर, पोकळे मळा, ट्री हाऊस शेजारी, मसजिद बाजूला, अल्ताफ शेख या बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृत बांधकामांचे ६ मजली टॉवर बांधले आहे. या अनधिकृत बांधकामावर यापूर्वी मनपा कडून कारवाई झाली होती परंतु बांधकाम निरीक्षक यांची ‘मेहेर नजर’ झाल्याने बांधकाम पुन्हा जोमात सुरु आहे. सदर बांधकामावर कारवाई झालेली असताना मनपा अधिकारी याकडे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण होऊ देतात यात मोठ्या प्रमाणावर ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष झाल्याने संबंधित उपअभियंता व अधिकारी यांची अँटी करप्शन कडून झाडाझडती आवश्यक बनली आहे.

अल्ताफ शेख यांच्या सोबतच निजाम शेख, साजिद शेख, बबलू यांनी बेकायदा बांधकामे जोमात सुरू असून यावर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

मनपा आयुक्त विक्रम कुमार गप्प का ?

कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांना चोरी-छुपे पाठिंबा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही. पारदर्शक प्रशासनासाठी नावाजलेले मनपा आयुक्त विक्रम कुमार कोंढव्याबाबत गप्प का? असा सवाल कोंढवा येथील नागरिक उपस्थित करु लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0