क्राईम न्यूजमुंबई
Trending

Illegal Bangladeshi : घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या दोन बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक

Mira Road Police Arrested Illegal Bangladeshi Migrants : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

मिरा रोड :- मिरा भाईंदरमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. Mira Road Police Take Action On Illegale Bangladeshi Migrants मिरारोडच्या ईडन रोज कॉम्प्लेक्सचे मेनगेटजवळ, सिरेमॅक्स, कनकिया रोड, मिरारोड पुर्व आणि हॉपी होम कॉम्लेक्सचे मेनगेटजवळ, पुनम गार्डन, मिरारोड पूर्व या दोन ठिकाणी बांगलादेश महिला नागरीक येणार असल्याची माहिती मिळाली असून ते समक्ष हजर राहुन दाखविणार आहे. दोन बांगलादेशी महिला येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीय.

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिसांनी मिरा रोड परिसरातील या कारवाईमध्ये बांगलादेशी महिलांना सिरेमॅक्स, कनकिया रोड, मिरारोड पुर्व आणि पुनम गार्डन, मिरारोड पूर्व ठिकाणी पंचा समक्ष सापळा रचून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.त्यांची चौकशी केली असता त्या मूळच्या बांगलादेशी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच त्या भारतात आल्याचं निष्पन्न झालं. मिरारोड पोलीस ठाण्यात दोन जणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहापोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंडे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले,शिवाजी पाटील, महिला पोलीस हवालदार निशीगंध मांजरेकर, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे, तृशा कटकधोड व पोलीस हवालदार सम्राट गावडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0