Illegal Bangladeshi : भारतात घुसखोरी केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांची जेलवारी, न्यायालयाने सुनावली शिक्षा
Illegal Bangladeshi Arrested: न्यायालयाने अवैध पद्धतीनं भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शिक्षा दिलीय. तसेच भारतात घुसखोरी केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना न्यायालयीन कोठडी आणि दंडाची शिक्षा सुनावलीय.
मुंबई :- भारतात बेकायदा पद्धतीनं प्रवेश केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना illegal Bangladeshi Three arrested मुंबईतील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी 8 वे न्यायालयाने न्यायालयीन तुरुंगवास आणि दंडात्मक शिक्षा ठोठावली आहे.त्यांच्यावर अवैध पद्धतीने भारतात प्रवेश केल्याचा आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याचा आरोप होता. मुंबईत हा प्रकार उघडकीस आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्त वार्ताहरच्या पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांना 24 मार्च 2024 रोजी काही बांगलादेशी नागरिक अनअधिकृतरित्या व अयोग्य मार्गाने कागदपत्रे शिवाय भारतात राहत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी विष्णुनगर,म्हाडा कॉलनी समोर, आरसीएफ चेंबूर, मुंबई येथे काही नागरिक येणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून याप्रकरणी तिघांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात अवैध पद्धतीने भारतात प्रवेश केल्याचा आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर प्रकरण गुन्ह्याचा तपास कक्ष-2 यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या पथकाने तपास करून तिन्ही आरोपी विरुद्ध न्यायालयात सबळ पुरावे सादर केल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी 8 वे न्यायालयाचे न्यायाधीश कांचन झंवर यांनी केसची सुनावणी दरम्यान उपलब्ध पुरावाच्या आधारे आरोपींना भादवि कलम 465,468,471, तसेच पासपोर्ट कायदा 1950, विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 च्या पॅरा 3(1) अंतर्गत कलम 14 नुसार तीन्ही आरोपींना कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावलेली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखाअंतर्गत विशेष मोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरी विरुद्ध एकूण 28 गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी 42 जणांना अटक केली आहे. तसेच, मदत करणारा एक भारतीय नागरिकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-दक्षिण, दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-2 प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक, प्रकटीकरण पोलीस निरीक्षक मिलींद काठे, पोलीस निरीक्षक समीर लोणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राकेश देशमुख, पोलीस उप निरीक्षक एम.एन. कुरेशी, सहाय्यक फौजदार प्रकाश कदम, पोलीस हवालदार जगदाळे, पाडवी, सकट, महिला पोलीस हवालदार मोरे, पोलीस शिपाई आव्हाड, गावडे,उथळे यांनी केलेली आहे.