Illegal Bangladeshi Migrants : घुसखोर बांगलादेशींवर मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Police Take Action On Illegale Bangladeshi Migrants : मुंबईतही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर धडक कारवाई सुरू झाली आहे. मुंबई परिमंडळ 9 च्या पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांवर जानेवारी महिन्यात कारवाई
मुंबई :- दिल्लीनंतर आता मुंबईतही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर धडक कारवाई सुरू झाली आहे. Illegal Bangladeshi Migrants मुंबईत अवैधरित्या आलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या जवळपास तीन आठवड्यात मुंबईतील विविध भागांतून 50 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी 2025 मध्ये अद्यापपर्यंत परिमंडळ-9 मुंबई अंतर्गत पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये बेकायदेशिरपणे वास्तव्यास असलेल्या 07 बांग्लादेशी नागरिकांना पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1950, परकिय नागरिक कायदा 1946 अन्वये अटक करून कारवाई करण्यात आले आहे. मागील वर्षी 2024 मध्ये परिमंडळ-9 अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीत एकूण 33 बेकायदेशिरपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.