क्राईम न्यूजमुंबई
Trending

Security Breach At IIT Bombay: आयआयटी मुंबईच्या सुरक्षेचा फज्जा! अनोळखी युवक घुसल्याची खळबळजनक घटना

Security Breach At IIT Bombay: सुरक्षा यंत्रणांवर उठले गंभीर प्रश्न; पवई पोलिसांचा तपास सुरु

मुंबई | देशातील सर्वोच्च तांत्रिक शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले Security Breach At IIT Bombay आहे. पवई येथील आयआयटीच्या परिसरात सुरक्षा यंत्रणा चकवा देत, एक अनोळखी तरुण थेट सभागृहात व्याख्यानावेळी घुसला, ही धक्कादायक घटना 17 जून रोजी उघडकीस आली. Mumbai Powai Police News

बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (वय 22, रा. मंगळूर, कर्नाटक) असे या तरुणाचे नाव असून, तो 2 ते 7 जून या कालावधीत आयआयटीच्या वसतिगृहात अनधिकृतपणे वास्तव्य करत होता, असे त्याने पोलिस तपासात कबूल केले आहे. विशेष म्हणजे, 4 जून रोजी तो आयआयटीच्या विभागप्रमुख शिल्पा कोटीवाल यांना दिसला होता, परंतु ओळखपत्र विचारताच पळ काढला होता.

17 जून रोजी पुन्हा संस्थेच्या सभागृहात तो दिसताच कोटीवाल यांनी सतर्कता दाखवत सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. लगेचच त्याला ताब्यात घेऊन पवई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रकारामुळे आयआयटीसारख्या उच्चस्तरीय संस्थेची सुरक्षा भेदली जाऊ शकते, हा गंभीर इशारा मिळाला असून, संस्थेतील प्रवेश, ओळख व गेटवरील नियंत्रण व्यवस्थेचा आढावा घेण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

पवई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, बिलालचा आयआयटीत येण्यामागचा उद्देश काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0