ICC T-20 World Cup : आठ संघांमध्ये 12 सामने होणार, सुपर 8 मध्ये कधी आणि कोणाचा सामना होणार, पहा संपूर्ण वेळापत्रक
•ICC T-20 World Cup 2024 च्या T20 विश्वचषकासाठी सर्व 8 संघ अंतिम झाले आहेत. या संघांमध्ये एकूण 12 सामने होणार आहेत. यामध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.
ICC T-20 World Cup :- 2024 च्या T20 विश्वचषकाच्या सुपर 8 साठी सर्व आठ संघ अंतिम झाले आहेत. बांगलादेश हा सुपर 8 मध्ये प्रवेश घेणारा शेवटचा संघ आहे. आता आठ संघांमध्ये एकूण 12 सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर टी-20 विश्वचषकाचे उपांत्य आणि अंतिम सामने आयोजित केले जातील. भारत आणि यूएसए सोबतच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश सुपर 8 साठी प्रवेश घेतला आहे.
सुपर 8 चे सामने 19 जूनपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 20 जून रोजी सामना होणार आहे. सुपर 8 साठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात चार संघ आहेत. भारत गट 1 मध्ये आहे. त्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशचाही समावेश आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांना गट 2 मध्ये ठेवण्यात आले आहे.
T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 चे पूर्ण वेळापत्रक
19 जून: यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
19 जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया
20 जून: अफगाणिस्तान विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, बार्बाडोस
20 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
21 जून: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आइलेट, सेंट लुसिया
21 जून: यूएसए विरुद्ध वेस्ट इंडिज, ब्रिजटाउन, बार्बाडोस
22 जून: भारत विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
22 जून: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट 23 जून: यूएसए विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, बार्बाडोस
23 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉर्थ साउंड, अँटिग्वा
24 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया
24 जून: अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अर्नोस व्हॅले, सेंट व्हिन्सेंट