क्रीडा

Icc Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा

Icc Champions Trophy 2025  : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. त्याचवेळी त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता.

India Champions Trophy Squad :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 9 मार्चपर्यंत खेळली जाईल. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.Icc Champions Trophy 2025  या स्पर्धेसाठी भारताच्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा मुख्य सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. त्याचबरोबर शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. या संघात विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर देखील आहेत. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांचीही संघात निवड झाली आहे. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या संघाचा भाग नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ खेळतील, ज्यांची 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया अ गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत आहे. ग्रुप स्टेजमध्ये या तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला जाईल. टीम इंडिया 20 फेब्रुवारीपासून या स्पर्धेत पदार्पण करणार आहे, या सामन्यात त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे.त्यानंतर टीम इंडिया आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर, गटातील शेवटच्या सामन्यात 2 मार्चला न्यूझीलंडशी सामना होईल. यानंतर उपांत्य फेरी आणि त्यानंतर अंतिम फेरी खेळली जाईल.

टीम इंडिया स्क्वॉड :- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, केएल राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पी. मोहम्मद शमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0