ICC Champions Trophy 2025 : बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

•भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग खेळणार नाही, हर्षदी राणाला संधी
ICC Champions Trophy 2025 :- भारत आणि बांगलादेशचा दुसरा सामना आज दुबईत खेळवला जाणार पाकिस्तान आणि आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आठ सामन्यात भारत दुबईत खेळणार आहे.आज 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना आहे. आज टीम इंडिया स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल.
बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्शदीप सिंग खेळत नाही. रवींद्र जडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन :- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन :- तनजी हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, झेकर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकीब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.