IAS Transfer : महाराष्ट्रात 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनीषा आव्हाळे यांच्याकडे पुण्यात मोठी जबाबदारी
IAS Transfer : महाराष्ट्रात अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मनीषा आव्हाळे यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. मनीषा स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
मुंबई :- महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या Police Officer बदल्या झाल्या होत्या, आता राज्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्याही IAS Transfer बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रमुख मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली असून त्या लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या बदलीची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त झाली आहे.
अभिनव गोयल यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे आता पुण्याच्या स्मार्ट सिटीची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या अधिकाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
विनायक महामुनी यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सतीशकुमार खडके यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौम्या शर्मा चांडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीपकुमार डांगे यांची नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.