महाराष्ट्र
Trending

IAS Transfer : फडणवीस सरकारची प्रशासनात मोठी उलथापालथ; मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra IAS Transfer : संजय खंदारे, परराग जैन नैनुतिया, कुणाल कुमार यांचा समावेश; प्रशासकीय वर्तुळात खांदेपालट सुरूच

मुंबई :- देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. फडणवीस यांच्या कार्यकाळात विशेषतः मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची परंपरा कायम राहिली आहे.

या आठवड्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत:

1.संजय खंदारे (IAS:RR:१९९६): प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथून त्यांची नियुक्ती प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

2.परराग जैन नैनुतिया (IAS:RR:१९९६): प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3.कुणाल कुमार (IAS:RR:१९९९): यांना शिवशाही पुनर्वासन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4.वीरेंद्र सिंह (IAS:RR:२००६): सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5.ई. रावेंदीरन (IAS:RR:२००८): मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांची नियुक्ती सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

6.एम.जे. प्रदीप चंद्रन (IAS:RR:२०१२): अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7.पवनीत कौर (IAS:RR:२०१४): उपमहासंचालक, यशदा, पुणे यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0