Maharashtra IAS Transfer Latest News : सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी; पिंपरी चिंचवड आयुक्त शेखरसिंह नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी
मुंबई :- राज्य शासनाने आज (7 ऑक्टोबर) प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल करत सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांसह राज्यातील काही महत्त्वाच्या प्रशासनिक पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुंभमेळा आयुक्तपदी शेखरसिंह
पुढील वर्षी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांना कुंभमेळा आयुक्त, नाशिक या पदावर नेमण्यात आले आहे.
नाशिक, जळगावला नवे जिल्हाधिकारी
नाशिक जिल्ह्याच्या प्रशासनात बदल करताना, सध्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्या
एम. देवेंद्रसिंह (माजी जिल्हाधिकारी, रत्नागिरी): महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती.
मनोज जिंदल (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी): यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
संजय कोलटे (व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई): यांची बदली साखर आयुक्त, पुणे या रिक्त पदावर झाली आहे.
या बदल्यांमुळे नाशिक, जळगाव आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या प्रशासनासह, राज्याच्या अन्य महत्त्वाच्या प्रशासनिक यंत्रणेत नवीन गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…