विभागीय आयुक्त, कोकण म्हणून कामकाज पाहणार
पुणे :- फेब्रुवारी 2024 दरम्यान डाॅ. राजेश देशमुख IAS Rajesh Deshmukh यांची बदली क्रीडा आयुक्त, पुणे म्हणून करण्यात आली होती. परंतु त्यांची कार्यशैली आणि कामाचा अनुभव पाहता डॉ. देशमुख यांना केवळ सहा महिन्याच्या आतच पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांना प्रशासनाने मोठी जबाबदारी दिली आहे. डॉ. राजेश देशमुख यांची विभागीय आयुक्त कोकण विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्या नवीन पदाचा कारभार विवेक पानसरे, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकार करावा असे आदेश अपर मुख्य सचिव यांनी काढले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक महत्त्वाच्या आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मागील दोन महिन्यांपासून बदलीचे सत्र चालूच आहे. पुणे शहरातील अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या मागील दीड ते दोन महिन्यात झाले आहे. त्यामध्ये पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे. तत्पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान पुणे शहरात तब्बल 500हुन अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच प्रशासनातील इतर 10हुन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामध्ये मोठा फेरबदल केला जातो. अनेक वेळा मर्जीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे एखाद्या नेत्यांवर अन्याय होऊ नये किंवा प्रतिस्पर्धी नेत्यांनी आरोप करू नये याकरिता या बदल्या केल्या जात असतात.