IAS Officer Transfer News : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; 19 वर्षांत 23 वेळा बदलीचा विक्रम

Maharashtra IAS Officer Transfer News : राज्य सरकारने 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या; मुंढेंची नियुक्ती आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी
मुंबई :- महाराष्ट्र सरकारने आज (5 ऑगस्ट) पाच भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे, ते कर्तव्यकठोर आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीने. गेल्या 19 वर्षांत ही त्यांची तब्बल 23 वी बदली आहे.
तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार आयुक्तपदावरून आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नियमांनुसार काम करण्याचा आग्रह धरणाऱ्या मुंढे यांना कोणत्याही सत्ताधाऱ्यांचे नियमबाह्य कामे करणे शक्य होत नसल्याने त्यांच्या बदल्या वारंवार होत असल्याचे बोलले जाते. साधारणपणे तीन वर्षांत बदली होणे अपेक्षित असताना, मुंढे मात्र सरासरी एका वर्षातच बदली होत असल्याचे दिसून येत आहे.
या बदल्यांमध्ये इतर अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या झाल्या आहेत.
1.नितीन काशीनाथ पाटील यांना विशेष आयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2.अभय महाजन यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
3.ओंकार पवार यांची नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
4.आशा अफजल खान पठाण यांची महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्ती झाली आहे, आणि त्यांच्याकडे मुख्यमंत्री सचिवालयाचा अतिरिक्त कार्यभारही असेल.


