पुणे

वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा संबंध नाही : अजित पवार

Ajit Pawar On Vaishnavi Hagwane Case : फक्त लग्नाला गेलो होतो, तरीही बदनामी – अजित पवार यांचे स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण”

पिंपरी-चिंचवड : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही, तरीही माझी बदनामी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली. Ajit Pawar On Vaishnavi Hagwane Case बारामती येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

“काही चॅनेल्सकडून माझे नाव या प्रकरणात विनाकारण जोडले जात आहे. मी केवळ त्या लग्नसमारंभाला उपस्थित होतो. त्यामुळे माझ्यावर संशय घेणे चुकीचे आहे. या प्रकरणाशी माझा सुतरामही संबंध नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या संबंधित कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना दिलेल्या सूचनांमध्ये त्यांनी फरारी आरोपींच्या शोधासाठी तीन नव्हे तर सहा पथके तातडीने कार्यान्वित करण्याचा आदेश दिला आहे. “या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

“राजकीय व्यक्तींना अनेकदा कार्यक्रमांना बोलावले जाते. त्या अनुषंगाने मी त्या लग्नाला गेलो होतो. इतकाच काय तो माझा संबंध आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

vivek

Recent Posts