Hyderabad Airport Raid : डोंबिवलीतून हैदराबाद एअरपोर्टवर थेट छापा! 2.12 कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड फरहान अखेर जाळ्यात

Manpada Police Raid : मानपाडा पोलिसांचे ड्रग्ज माफियांवर जबरदस्त ‘क्लोज ऑपरेशन’, गुप्त माहितीवरून सापळा यशस्वी
डोंबिवली | डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी Dombivli Manpada Police अंमली पदार्थांच्या रॅकेटवर आणखी एक मोठा घाव घातला आहे. 2.12 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान याला हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर ‘एअरपोर्ट ट्रॅप’ लावून त्याला अटक केली. Thane Police Latest Drug Racket Busted News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,27 जून 2025 रोजी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. डाउन टाउन, खोणी-पलावा परिसरात 1.93 किलो एमडी ड्रग्जसह तब्बल 2.12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या कारवाईत तीन जणांना — असिल जाबर सुर्वे (26 वय), मोहम्मद इसा कुरेशी आणि महिला आरोपी मेहेर फातिमा रिजवान देवजानी अटक करण्यात आली होती. मात्र, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरहान गुन्हा दाखल होताच फरार झाला होता.
फरहान हा खोटी ओळख आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतातून पळ काढण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या ‘इन्फॉर्मर नेटवर्क’मुळे हा कट उधळून लावण्यात आला. दिनांक 29 जून रोजी पोलिसांनी त्याला हैदराबादच्या विमानतळावर रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला तातडीने कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासात हेही समोर आले आहे की फरहानचा विविध देशांमध्ये ड्रग्ज पुरवठ्याचा नेटवर्क कार्यरत होता. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार नोंदवला गेला आहे.
ही हाई-प्रोफाईल अटक ही अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे आणि त्यांचं संपूर्ण पथक — सहाय्यक पोलीस निरीक्षक कलगोंडा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, पोलीस शिपाई मिननाथ बडे, किशोर दिघे — यांनी प्रचंड मेहनतीने ही सर्जिकल ऑपरेशन यशस्वी केलं आहे.


