क्राईम न्यूजमुंबई
Trending

बोरीवलीत मुलांमधील वादातून घर व दुचाकीला आग; आरोपींना पोलिसांचा तपास पुढे

Mumbai Latest Crime News : सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला घातपाताचा प्रकार, चार आरोपींवर हत्येचा प्रयत्न गुन्हा,इतर आरोपी अजून फरार

मुंबई :- बोरीवली (प.) येथील गणपत पाटील नगमधील एका घराला 14 मे रोजी भीषण आग लागली. सुरुवातीला ही दुर्घटना वाटली, मात्र तपासात सीसीटीव्ही फुटेजमुळे हा घातपात असल्याचे समोर आले. तक्रारदार महिला ज्युली केवट (37 वय) यांच्या घराशेजारी उभ्या असलेल्या दुचाकीला आणि घराला चार आरोपींनी आग लावली होती.

एमएचबी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी देवराज सिद्धार्थ पाटील (22 वय) याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपी अजून फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस तपासात असे स्पष्ट झाले की, मुलांमधील वादातून हा प्रकार घडला. तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद आरोपी शादाबसोबत सुरू झाला होता. त्यानंतर आरोपी व त्यांचे साथीदार 13 मे मध्यरात्री तक्रारदारांच्या घराबाहेर दुचाकी व घराला आग लावून नुकसान केलं. सुदैवाने शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.याप्रकरणानंतर केवळ यांनी नुकतीच एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109,326 (एफ), 336 (जी), 351 (3), 3 (5), 37 (1) व 135 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचे चेहरे उघड झाले, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितले की, गुन्ह्याच्या तपासाला वेगाने पुढे नेण्यात येत आहे आणि लवकरच इतर आरोपींचाही शोध लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0