•भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर करण्याची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला लुटले ; आधार कार्ड, सिम कार्डच्या गैरवापराने भीती दाखवली; सायबर साक्षरतेची तातडीची गरज
नाशिक :- नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) या सायबर फसवणुकीच्या अत्यंत धोकादायक पद्धतीने दोन मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात एका ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपये तर दुसऱ्या वृद्ध व्यक्तीला तब्बल 6 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी पीडितांना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत मानसिकरित्या हतबल केले.
सरन्यायाधीशांच्या नावाने धमकी
गंगापूर रोडवरील लालसरे दाम्पत्याच्या बाबतीत ही घटना घडली. 74 वर्षीय अनिल लालसरे यांना सायबर फ्रॉडचा फटका बसला. आरोपींनी त्यांना फोन करून, “तुमच्या आधार कार्डवरून क्रेडिट कार्ड इश्यू करण्यात आले असून त्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले आहे आणि आता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर केले जाईल.” अशी भीती दाखवली.
या गैरव्यवहारासाठी 72 लाख रुपयांचा दंड झाल्याचे सांगत, ती रक्कम न भरल्यास सीबीआयचे पथक अटक करून दिल्लीला घेऊन जाईल, अशी धमकी देण्यात आली.
आयुष्यभराची पुंजी गमावली
वृद्धापकाळ आणि पत्नीच्या अर्धांगवायूच्या आजारामुळे भावनिकदृष्ट्या खचलेल्या अनिल लालसरे यांनी, व्यवस्थित चालता येत नसतानाही बँकेत जाऊन आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर RTGS द्वारे पैसे भरून दिले आणि आयुष्यभराची पुंजी गमावली. नातेवाईक भेटायला आल्यावर ही धक्कादायक घटना उघड झाली.
6 कोटींचा दुसरा फ्रॉड
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असतानाच, आणखी एका वृद्ध व्यक्तीला अशाच पद्धतीने तब्बल 6 कोटी रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. तुमच्या सिम कार्डवरून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सरन्यायाधीशांच्या कोर्टात हजर करण्यात आल्याचे सांगत त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली होती.
सायबर साक्षरतेची गरज
तंत्रज्ञान अवगत नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या रॅकेटवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी तज्ज्ञ करत आहेत. “ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे, याची माहिती सायबर गुन्हेगारांना कशी मिळते, याचा छडा लावल्याशिवाय हे रॅकेट उद्ध्वस्त होणार नाही,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…