Samruddhi Mahamarg Accident : देवदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला वाशिमजवळ अपघात; अचानक ब्रेक लावल्याने मागून धडक, जखमींना कारंजात हलवले
नाशिक :- समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली.Samruddhi Mahamarg Accident या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथून भाविक देवदर्शनासाठी शिर्डीकडे जात होते. धनज गावाजवळ समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारला हा अपघात झाला.पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणारी कार अनियंत्रित झाली आणि तिने जोरदार धडक दिली.या अपघातात कारचालक मंगेश (पूर्ण नाव अज्ञात) आणि विक्रम अशोकराव सौरगपते (वय 40, रा. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
जखमींवर उपचार सुरू
अपघातात अनुकूल मनोज यादव (वय 35, रा. दत्त चौक, यवतमाळ) आणि मयूर दीपक डोनाडकर (वय 29, रा. दत्त चौक, यवतमाळ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी कारंजा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.समृद्धी महामार्गावर झालेला हा भीषण अपघात आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…