मुंबई
Hookah Parlor at Vibes Cafe: वाईब्स कॅफेमध्ये हुक्का पार्लर
पनवेल:- खारघर शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास येत असताना शहरात विद्याथ्यर्थ्यांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटले जात आहे. याकरिता शहरात कॅफेच्या आडून हुक्का पार्लर सुरू होत आहेत. खारघर सेक्टर ८ मधील वाईब्स कॅफेच्या नावाखाली हा हुक्का पार्लर Hookah Parlor at Vibes Cafe सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्लरमध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणाई मौजमजेसाठी येत असतात. कॅफेच्या नावाखाली शहरात हुक्का पार्लर सुरू होत आहेत. अशाप्रकारे अनधिकृतपणे हुक्का चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक पोलिस प्रशासनाकडे करीत आहेत.