मुंबई
Trending

Honeytrap Scandal : हनी ट्रॅपचा भडका विधानसभेत! नाना पटोले थेट पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात

Nana Patole On Honey Trap : “72 अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅपमध्ये सहभाग, मंत्रीही अडकल्याची माहिती” – नाना पटोले यांचा दावा

मुंबई | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी एकच खळबळ उडाली, जेव्हा काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी थेट हनी ट्रॅप प्रकरणासंबंधीचा ‘पेन ड्राइव्ह’ विधानसभेत सादर केला. त्यांनी दावा केला की, राज्यातील 72 हून अधिक अधिकारी आणि काही मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, आणि यामध्ये ठाणे, नाशिक, मुंबई ही शहरे हनी ट्रॅपची केंद्र बनली आहेत.

“माझ्याकडे सगळ्या पुराव्यांसह पेन ड्राइव्ह आहे. सरकारने मत मांडलं तर तो सादर करण्यास तयार आहे,” असं स्पष्ट करत पटोले यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली. “हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची गोपनीय कागदपत्रं अँटी-सोशल गटांच्या हाती जात आहेत, आणि तरीही सरकार गप्प आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “नाशिकसारख्या पुण्यभूमीचं नाव अशा प्रकरणात येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. कोणत्या अनैतिकतेचा वापर करून माणूस पैसे कमावतोय, हे धक्कादायक आहे.” तर आमदार जयंत पाटील यांनीदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ निवेदन द्यावे, अशी मागणी केली.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रतिक्रिया देताना, “या प्रकरणाची सरकारने दखल घेतली आहे,” असं सांगितलं. मात्र सरकारकडून ठोस कृती किंवा निवेदन अद्याप आलेले नाही.

पण आता जेव्हा नाना पटोले थेट पेन ड्राइव्हसह सभागृहात उतरले, तेव्हा राज्य सरकारवर दबाव आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. हे सर्व प्रकरण सरकारच्या विश्वासार्हतेवर आणि प्रशासनाच्या गुप्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0