मुंबई

Honeymoon Murder : “मधुचंद्राची हत्या!” – प्रेमातून विष, संशयाच्या छायेत सोनमच

•मेघालयमधील मृत्यूमध्यंतेकथा; नवविवाहित पतीचा खून आणि पत्नीवरच संशय

ANI :- प्रेमाचं वचन, विवाहाचा आनंद आणि मधुचंद्राची स्वप्नं… पण अवघ्या काही दिवसांत एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याला काळोखाची किनार लाभली. मेघालयमध्ये मधुचंद्रासाठी गेलेले इंदोरचे राजा आणि सोनम रघुवंशी यांचं नातं थरारक वळणावर आलं आहे.

23 मेपासून बेपत्ता असलेले हे दाम्पत्य चर्चेचा विषय ठरत असतानाच, 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडतो. आणि आठ दिवसांनी, उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर सोनम सापडते – विमनस्क अवस्थेत. पोलिसांचा खळबळजनक दावा असा की, सोनमनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी भाडोत्री मारेकऱ्यांना सुपारी दिली होती.

11 मे रोजी विवाहबद्ध झालेलं हे प्रेमीयुगुल अवघ्या काही दिवसांत काळाच्या आड गेलं. मधुचंद्राचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त होण्याआधीच, राजाचं शरीर धबधब्याजवळ एका खोल खड्ड्यात सापडलं.

कोण खरं आणि कोण खोटं – हे अद्याप तपासाअंती स्पष्ट होणार असलं, तरी एक गोष्ट निश्चित आहे – प्रेमाच्या मुखवट्याआड लपलेल्या रहस्यांनी आज समाजात भीतीचं सावट निर्माण केलं आहे.

सोनमवर पोलिसांनी केलेले आरोप गंभीर आहेत – पण तिचे वडील या दाव्यांना साफ नाकारतात. “सर्व आरोप खोटे! आमची मुलगी निर्दोष आहे. पोलीसच गुन्हेगारांशी संगनमत करून काम करतायत,” असा घणाघात देवी सिंह यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, “जी ॲक्टिव्हा स्कूटर दोघांनी शिलाँगमध्ये भाड्याने घेतली होती, तिचं सामान राजा रघुवंशीच्या मृतदेहाजवळ कसं पोहोचलं? यात अंतर्गत हात आहे.” त्यामुळे तपास फक्त पोलिसांच्या कहाण्यावर न थांबता, आता या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0