Honey Singh Live Music Fraud : बॉलीवूड सुप्रसिद्ध गायक हानी सिंग लाईव्ह म्युझिक शोच्या नावाखाली 63 लाखांचा गंडा !
Honey Singh Live Music Fraud बुक माय शोकडे तक्रार व एम एम आर डी एला कायदेशीर नोटीस, नवी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार ; दिपक ठोंबरे
पनवेल, जितीन शेट्टी : सुप्रसिद्ध सिंगर यो यो हानी सिंग यांचा मुंबईत लाईव्ह म्युझिक शो आयोजित करण्याच्या नावाखाली पनवेल येथील रहिवाशी असेलेला आयोजक विवेक रवी रमण याने “फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल”कंपनीच्या नावाने लाखो रुपये उकळून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी फसवणूक झालेले खारघर, नवी मुंबई येथील रहिवाशी दिपक ठोंबरे यांनी नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचे तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम कोरडे यांनी दिली. याप्रकरणी दिपक ठोंबरे यांनी कायदेशीर लढाई देखील सुरु केली आहे. आयोजक विवेक रवी रमण याच्यासह “फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल* कंपनी आणि एमएमआरडीएला कायदेशीर नोटीस बजावली आहे. याप्रकरणी बुक माय शो कंपनीकडे देखील तक्रार केली आहे. दरम्यान, नवी मुंबई पोलीस या प्रकरणाची कशी चौकशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यो यो हनी सिंग यांच्या खोट्या शो मुळे दिपक ठोंबरे यांची कशाप्रकारे फसवणूक झाली?
खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना फसवणूक झालेले तक्रारदार दिपक ठोंबरे म्हणाले , पनवेल येथे राहणारा विवेक रवी रमण हा फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीचा मालक आहे. त्याचे नेरुळ येथील हावरे सेंच्युरियन मॉल मधील ऑफिसमध्ये विवेकचे जवळचे शिक्षक गिरीश चव्हाण यांनी भेट घडवून आणली. विवेकने मुंबई बांद्रा येथील बीकेसी मैदानावर सुप्रसिद्ध सिंगर यो यो हानी सिंग यांचा 15 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजता म्युझिक शो आयोजित केला होता . विवेक रवी रमण या व्यक्तीने त्याच्या शिक्षकाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधल्याचे दिपक ठोंबरे यांनी पत्रकारांना सांगितले. या शोमध्ये 5 ते 6 कोटींचा प्रॉफिट होणार असल्याचे सांगून कार्यक्रमासाठी तुम्ही आर्थिक मदत केल्यास संपूर्ण रक्कम दामदुप्पटीने मिळेल असे आश्वासित केले. बुक माय शो वरील लाईव्ह शो प्रमोशन दाखवून त्याने विश्वास संपादन केल्याचे दिपक ठोंबरे यांनी पत्रकारांना सांगितले.सिंगर यो यो हानी सिंगच्या मुंबई येथील शोसाठी 63 लाख 50 हजार रुपये दिले असून रक्कमेच्या बदल्यात परतावा म्हणून एक कोटी रुपये देण्याचे शोचा आयोजक विवेक रवी रमण आणि त्याच्या फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीने मान्य केले होते . व्यवहार पूर्ण होण्यासाठी विवेक रवी रमण आणि त्याच्या फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीने लेखी लिहून दिले आहे. तसेच परतावा सिक्युरिटी म्हणून काही चेक्स दिले. सदर शोसाठी संपूर्ण 63 लाख 50 हजर रुपये बँकेकडून कर्ज काढून दिले. काही रक्कम क्रेडिट कार्ड द्वारे दिले, असे दिपक ठोंबरे यांनी सांगितले.सदर रक्कमेचा परतावा शो झाल्यानंतर 10 दिवसात देण्याचे लेखी आश्वासन आयोजकांनी दिले व जो पर्यंत रक्कम परत देत नाहीं तो पर्यंत बँक चें हफ्ते व क्रेडिट कार्ड चे हफ्ते आयोजक भरणार अशी बोलणी केली . विवेक रवी रमण हा बुक माय शो वरील बुकिंग मध्ये अफरातफर करून करोडो रुपाईची बुकिंग चार्ट त्याच्या शिक्षका द्वारे पाठवायचा .तसेच बुक माय शो टीम बरोबर संपर्क करण्याबद्दल बोलले असता मुद्दाम त्याच्या शिक्षकाद्वारे टाळाटाळ करायचा, असा आरोप दिपक ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पितळ उघडे पडले
शो च्या दिवशी आपली फसवणूक झाली असे उघड झाले.तेव्हा विवेक रवी रमण याने सर्व नुकसाभरपाई लवकरच देणार अशे आश्वासन दिले व मात्र अद्यापि वेळ मारून नेली .आयोजक विवेक रवी रमण आणि त्याच्या फेस्टीव्हीना म्युझिक फेस्टिवल कंपनीचे ढिसाळ नियोजन, बेजबाबदारपणामुळे हानी सिंगचा शोचा बट्ट्याबोळ झाला. आयोजकाने वेंडर्स लोकांना पैसे न दिल्याने शो बारगळला. शो उशिरा सुरु झाला मात्र काही मिनिटातच बंद पडला. बुक माय शोद्वारे जमा झालेली रक्कम सिंगर आणि वेंडर्स लोकांना दिले. मात्र, माझ्या 63 लाख 50 हजार रुपयांचा परतावा अद्यापि दिला नाही. विवेक रवी रमण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याने पैसे दिले नाहीत. उलट, खोटी आश्वासने देऊन प्रत्येक वेळी वेळ मारून नेली. शेवटी , विवेकने दिपक ठोंबरे यांना काही चेक्स जमा करायला सांगितले आणि 11 मे 2023 पर्यंत सर्व रक्कम पूर्ण करतो असे सांगितले. दिलेल्या चेक्स पैकी 30 लाखाचे चेक जमा केले असता ते चेक्स विवेक ने बाऊन्स केले. चेक बाऊन्सचा खटला पनवेल न्यायालयात मध्ये चालु आहे, अशी माहिती दिपक ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली.
नवी मुंबई पोलीस आयुक्ताकडून न्यायची अपेक्षा
विवेक रवी रमणने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली . या प्रकरणी न्यायालयीन लढाई देखील लढत असल्याचे दिपक ठोंबरे यांनी सांगितले. या प्रकरणी बुक माय शोला देखील तक्रार केली आहे. एम एम आर डी प्रशासनाने सदर कार्यक्रमासाठी मैदान दिले होते. या कार्यक्रमात झालेली फसवणुकीमुळे डिपॉझिटची रक्कम आयोजकांना देऊ नये, अशी मागणी केली. मात्र एम एम आर डी प्रशासनाने आयोजकांचा रक्कम देऊन टाकली. आयोजकांची खातरजमा न करता बुक माय शो तसेच प्रसिद्ध सिंगर यो यो हानी सिंग यांनी त्याला लाईव्ह म्युझिक शो आयोजित करण्यासाठी परवानगी कशी दिली . तसेच एम एम आर डी ए ने मैदान देताना आयोजकाने नियमांचे काटेकोरपणे पालन केले कि नाही, याची तपासणी का नाही केली. ? असा सवाल दीपक ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी दिपक ठोंबरे यांनी केली पत्रकार परिषदेत केली आहे.