मुंबई

Hit And Run Case Update : मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

•Worli Hit And Run Case Update आदित्य ठाकरे वरळीतील नाखवा परिवाराच्या घरी कुटुंबाचे सांत्वन, आदित्य ठाकरे समोर कुटुंबाने हंबरडा फोडला

मुंबई :- वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही कार शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा यांची होती. पोलिसांनी मिहीर शाहला अटक केली आहे. मिहीरला शिवडी न्यायालयात हजर केले असता बुधवारी त्याला 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ही घटना घडल्यानंतर आरोपींनी कारची नंबर प्लेट काढून फेकून दिल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. ती नंबर प्लेट कुठे आहे ते शोधावे लागेल.

आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबाची घेतली भेट..!
शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. आदित्य ठाकरेंसोबत काँग्रेसचे नेते अस्लम शेख देखील उपस्थित होते.

आदित्य ठाकरे हे वरळी येथील नाखवा यांच्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी कुटंबीयांनी आदित्य ठाकरेंसमोर एकच हंबरडा फोडला. कावेरी नाखवा यांच्या आई म्हणाल्या की जे माझ्या मुलीसोबत केलं तेच त्यांच्यासोबत केलं पाहिजे, तेव्हा त्यांना वेदना कळतील.

दादा.. त्यांना नाही सोडायचं… मुलीचा आक्रोश

रडता रडता ती आदित्य ठाकरेंना म्हणाली, दादा.. नाही सोडायचं त्यांना, ते सुटायला नको. यावेळी काही क्षण आदित्य ठाकरेंनाही भरुन आलं आणि ते म्हणाले, त्यांना सोडायचं नाहीच आहे, शिक्षाच द्यायची आहे, सगळ्यात कठोर शिक्षा आपण त्यांना देऊ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0