मुंबई
Trending

Hinjewadi Heavy Rain : हिंजवडी आयटी पार्क की ‘वॉटर पार्क’? – पावसाने ओढवलेली दुर्दशा

Rohit Pawar On Hinjewadi Heavy Rain : रोहित पवार यांची एमआयडीसीकडे ‘बोटिंग सर्व्हिस’ सुरू करण्याची उपरोधिक मागणी

पुणे :- आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रस्त्यांना अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने नद्यांचं रूप दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये वाहने अक्षरशः पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. परिणामी, हे ‘आयटी पार्क’ नसून ‘वॉटर पार्क’ आहे का, असा उपरोधिक सवाल उपस्थित झाला आहे. Rohit Pawar On Hinjewadi Heavy Rain

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मिश्कील पण नेमकं भाष्य करत “हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज दिला आहे, त्यामुळे एमआयडीसीने आता जलवाहतूक सेवा सुरू करायला हरकत नसावी”, अशी टिप्पणी केली. ते पुढे म्हणाले, “दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अनेक तास वीज नसणे आणि आता हे जलमय रूप – अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आणि आयटी कंपन्या इथे टिकतील का?”

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत हिंजवडीतील पाणी साचण्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, “नालेसफाईची कामे वेळेवर झाली नसल्यामुळेच हा त्रास निर्माण झाला आहे. नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0