Stone pelting on shiv sena thackeray group vehicles : निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याची घटना बुधवारी हिंगोलीत घडली. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या समर्थकांना मारहाण झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
हिंगोली :- हिंगोली येथे निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. shiv sena thackeray group पक्ष समर्थकांवर मारहाणीचेही आरोप झाले आहेत. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रचारासाठी बाहेर पडले होते.त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. Stone pelting on shiv sena thackeray group या दगडफेकीत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती ठाकरे गटाचे उमेदवार संतोष तारफे यांनी दिली आहे. ही घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात घडली आहे.या घटनेनंतर ठाकरे गटाचे उमेदवार संतोष तरफे व कार्यकर्त्यांनी कळमनुरी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. ठाकरे गटाच्या गाड्यांवर दगडफेक करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
संतोष तारफे म्हणाले की, आमचे सर्व कार्यकर्ते वाकोडी येथे प्रचारासाठी गेले होते, तेव्हा तोच विरोधी पक्ष तेथे सुमारे 2 हजार महिलांना गोळा करून पैसे देत होता. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी त्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली.ते लोक इथेच थांबले नाहीत, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. आमचे कार्यकर्तेही बेपत्ता आहेत.